Main pages

Surah Al-Burooj ( The Big Stars )

Marathi

Surah Al-Burooj ( The Big Stars ) - Aya count 22

وَٱلسَّمَآءِ ذَاتِ ٱلْبُرُوجِ ﴿١﴾

१. बुरुजांवाल्या आकाशाची शपथ.

وَٱلْيَوْمِ ٱلْمَوْعُودِ ﴿٢﴾

२. वायदा केलेल्या दिवसाची शपथ!

وَشَاهِدٍۢ وَمَشْهُودٍۢ ﴿٣﴾

३. हजर होणाऱ्या आणि हजर केल्या गेलेल्याची शपथ!

قُتِلَ أَصْحَٰبُ ٱلْأُخْدُودِ ﴿٤﴾

४. (की) खंदकवाल्यांचा सर्वनाश केला गेला.

ٱلنَّارِ ذَاتِ ٱلْوَقُودِ ﴿٥﴾

५. ती एक आग होती इंधनाची.

إِذْ هُمْ عَلَيْهَا قُعُودٌۭ ﴿٦﴾

६. जेव्हा ते लोक तिच्या जवळपास बसले होते.

وَهُمْ عَلَىٰ مَا يَفْعَلُونَ بِٱلْمُؤْمِنِينَ شُهُودٌۭ ﴿٧﴾

७. आणि ईमानधारकांशी जे करीत होते, ते आपल्या समोर पाहात होते.

وَمَا نَقَمُواْ مِنْهُمْ إِلَّآ أَن يُؤْمِنُواْ بِٱللَّهِ ٱلْعَزِيزِ ٱلْحَمِيدِ ﴿٨﴾

८. हे लोक त्या ईमानधारकांच्या अन्य एखाद्या अपराधाचा सूड घेत नव्हते, याखेरीज की त्यांनी वर्चस्वशाली, सर्व प्रशंसेस पात्र अशा अल्लाहवर ईमान राखले होते.

ٱلَّذِى لَهُۥ مُلْكُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۚ وَٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍۢ شَهِيدٌ ﴿٩﴾

९. ज्याच्यासाठी आकाश आणि धरतीचे साम्राज्य व राज्यसत्ता आहे आणि प्रत्येक वस्तू सर्वश्रेष्ठ अल्लाहसमोर आहे.

إِنَّ ٱلَّذِينَ فَتَنُواْ ٱلْمُؤْمِنِينَ وَٱلْمُؤْمِنَٰتِ ثُمَّ لَمْ يَتُوبُواْ فَلَهُمْ عَذَابُ جَهَنَّمَ وَلَهُمْ عَذَابُ ٱلْحَرِيقِ ﴿١٠﴾

१०. निःसंशय, ज्या लोकांनी ईमानधारक पुरुषांना व स्त्रियांना सताविले, मग माफीही मागितली नाही तर त्यांच्यासाठी जहन्नमची शिक्षा-यातना आहे आणि जळण्याची शिक्षा.

إِنَّ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّٰلِحَٰتِ لَهُمْ جَنَّٰتٌۭ تَجْرِى مِن تَحْتِهَا ٱلْأَنْهَٰرُ ۚ ذَٰلِكَ ٱلْفَوْزُ ٱلْكَبِيرُ ﴿١١﴾

११. निःसंशय, ईमान कबूल करणाऱ्यांकरिता आणि सत्कर्म करणाऱ्यांकरिता त्या बागा आहे, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. हीच मोठी सफलता आहे.

إِنَّ بَطْشَ رَبِّكَ لَشَدِيدٌ ﴿١٢﴾

१२. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याची पकड मोठी सक्त आहे.

إِنَّهُۥ هُوَ يُبْدِئُ وَيُعِيدُ ﴿١٣﴾

१३. तोच पहिल्यांदा निर्माण करतो आणि तोच दुसऱ्यांदा जिवंत करील.

وَهُوَ ٱلْغَفُورُ ٱلْوَدُودُ ﴿١٤﴾

१४. तो मोठा माफ करणारा आणि खूप स्नेह-प्रेम करणारा आहे.

ذُو ٱلْعَرْشِ ٱلْمَجِيدُ ﴿١٥﴾

१५. अर्शचा स्वामी, अत्याधिक महानता राखणारा.

فَعَّالٌۭ لِّمَا يُرِيدُ ﴿١٦﴾

१६. जे इच्छिल ते करून टाकणारा आहे.

هَلْ أَتَىٰكَ حَدِيثُ ٱلْجُنُودِ ﴿١٧﴾

१७. काय तुम्हाला लष्करांची बातमीही मिळाली आहे?

فِرْعَوْنَ وَثَمُودَ ﴿١٨﴾

१८. (अर्थात) फिरऔन आणि समूदची.

بَلِ ٱلَّذِينَ كَفَرُواْ فِى تَكْذِيبٍۢ ﴿١٩﴾

१९. खरे तर हे इन्कारी लोक खोटे ठरविण्याच्याच मागे लागले आहेत.

وَٱللَّهُ مِن وَرَآئِهِم مُّحِيطٌۢ ﴿٢٠﴾

२०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहनेही त्यांना सगळीकडून घेरले आहे.

بَلْ هُوَ قُرْءَانٌۭ مَّجِيدٌۭ ﴿٢١﴾

२१. किंबहुना हा कुरआन मोठी शान वैभव (प्रशंसा) राखणारा आहे.

فِى لَوْحٍۢ مَّحْفُوظٍۭ ﴿٢٢﴾

२२. ‘लोहे महफूज’मध्ये (लिहिलेला).