Marathi
Surah Al-Qiyamah ( The Resurrection ) - Aya count 40
لَآ أُقْسِمُ بِيَوْمِ ٱلْقِيَٰمَةِ ﴿١﴾
१. मी शपथ घेतो कयामतच्या दिवसाची
وَلَآ أُقْسِمُ بِٱلنَّفْسِ ٱللَّوَّامَةِ ﴿٢﴾
२. आणि मी शपथ घेतो, धिःक्कार करणाऱ्या मना (आत्म्या) ची.
أَيَحْسَبُ ٱلْإِنسَٰنُ أَلَّن نَّجْمَعَ عِظَامَهُۥ ﴿٣﴾
३. काय मनुष्य असा विचार करतो की आम्ही त्याची हाडे एकत्र करणारच नाहीत?
بَلَىٰ قَٰدِرِينَ عَلَىٰٓ أَن نُّسَوِّىَ بَنَانَهُۥ ﴿٤﴾
४. होय अवश्य करू, आम्हाला सामर्थ्य आहे की त्याच्या बोटांचे एक एक पेर ठीक करावे.
بَلْ يُرِيدُ ٱلْإِنسَٰنُ لِيَفْجُرَ أَمَامَهُۥ ﴿٥﴾
५. परंतु मनुष्य तर इच्छितो की पुढे अवज्ञा आणि अवहेलना करीत राहावे.
يَسْـَٔلُ أَيَّانَ يَوْمُ ٱلْقِيَٰمَةِ ﴿٦﴾
६. विचारतो की कयामतचा दिवस केव्हा येईल.
فَإِذَا بَرِقَ ٱلْبَصَرُ ﴿٧﴾
७. तर जेव्हा डोळे जडवत होतील.
وَخَسَفَ ٱلْقَمَرُ ﴿٨﴾
८. आणि चंद्र निस्तेज होईल.
وَجُمِعَ ٱلشَّمْسُ وَٱلْقَمَرُ ﴿٩﴾
९. आणि सूर्य व चंद्र एकत्र केले जातील.
يَقُولُ ٱلْإِنسَٰنُ يَوْمَئِذٍ أَيْنَ ٱلْمَفَرُّ ﴿١٠﴾
१०. त्या दिवशी मनुष्य म्हणेल की आज पळून जाण्यास जागा कोठे आहे?
كَلَّا لَا وَزَرَ ﴿١١﴾
११. नाही नाही, आश्रय घेण्याचे कोणतेही ठिकाण नाही.
إِلَىٰ رَبِّكَ يَوْمَئِذٍ ٱلْمُسْتَقَرُّ ﴿١٢﴾
१२. आज तर तुझ्या पालनकर्त्याकडेच (आश्रयाचे) ठिकाण आहे.
يُنَبَّؤُاْ ٱلْإِنسَٰنُ يَوْمَئِذٍۭ بِمَا قَدَّمَ وَأَخَّرَ ﴿١٣﴾
१३. आज माणसाला, त्याने जे काही पुढे पाठविले आणि जे काही मागे सोडले, त्याविषयी अवगत करून दिले जाईल.
بَلِ ٱلْإِنسَٰنُ عَلَىٰ نَفْسِهِۦ بَصِيرَةٌۭ ﴿١٤﴾
१४. किंबहुना मनुष्य स्वतःच स्वतःवर प्रमाण आहे.
وَلَوْ أَلْقَىٰ مَعَاذِيرَهُۥ ﴿١٥﴾
१५. मग तो कितीही सबबी सादर करीत असला तरी.
لَا تُحَرِّكْ بِهِۦ لِسَانَكَ لِتَعْجَلَ بِهِۦٓ ﴿١٦﴾
१६. (हे पैगंबर!) तुम्ही कुरआनास त्वरित तोंडी पाठ करण्यासाठी आपल्या जीभेला (घाईने) हलवू नका.
إِنَّ عَلَيْنَا جَمْعَهُۥ وَقُرْءَانَهُۥ ﴿١٧﴾
१७. त्यास एकत्र करणे आणि (तुमच्या तोंडून) पठण करविणे आमची जबाबदारी आहे.
فَإِذَا قَرَأْنَٰهُ فَٱتَّبِعْ قُرْءَانَهُۥ ﴿١٨﴾
१८. (यास्तव) आम्ही जेव्हा त्याचे पठण संपवू तेव्हा तुम्ही त्याच्या पठणाचे अनुसरण करा.
ثُمَّ إِنَّ عَلَيْنَا بَيَانَهُۥ ﴿١٩﴾
१९. त्यास स्पष्ट करणे आमचे काम आहे.
كَلَّا بَلْ تُحِبُّونَ ٱلْعَاجِلَةَ ﴿٢٠﴾
२०. नव्हे, तुम्ही तर लवकर प्राप्त होणाऱ्या (जगा) शी प्रेम राखता.
وَتَذَرُونَ ٱلْءَاخِرَةَ ﴿٢١﴾
२१. आणि आखिरतला सोडून बसला आहात.
وُجُوهٌۭ يَوْمَئِذٍۢ نَّاضِرَةٌ ﴿٢٢﴾
२२. त्या दिवशी अनेक चेहरे ताजे टवटवीत (व तेजस्वी) असतील.
إِلَىٰ رَبِّهَا نَاظِرَةٌۭ ﴿٢٣﴾
२३. आपल्या पालनकर्त्याकडे पाहत असतील
وَوُجُوهٌۭ يَوْمَئِذٍۭ بَاسِرَةٌۭ ﴿٢٤﴾
२४. आणि कित्येक चेहरे त्या दिवशी (कुरुप आणि) उदास असतील
تَظُنُّ أَن يُفْعَلَ بِهَا فَاقِرَةٌۭ ﴿٢٥﴾
२५. समजत असतील की त्यांच्याशी कंबर तोडणारा व्यवहार केला जाईल.
كَلَّآ إِذَا بَلَغَتِ ٱلتَّرَاقِىَ ﴿٢٦﴾
२६. नाही नाही जेव्हा (प्राण) कंठाशी पोहचतील
وَقِيلَ مَنْ ۜ رَاقٍۢ ﴿٢٧﴾
२७. आणि सांगितले जाईल की कोणी झाड फुंक (तंत्र मंत्र) करणारा आहे?
وَظَنَّ أَنَّهُ ٱلْفِرَاقُ ﴿٢٨﴾
२८. आणि त्याने खात्री केली की ही वियोगाची वेळ आहे.
وَٱلْتَفَّتِ ٱلسَّاقُ بِٱلسَّاقِ ﴿٢٩﴾
२९. आणि पोटरीशी पोटरी बिलगेल.
إِلَىٰ رَبِّكَ يَوْمَئِذٍ ٱلْمَسَاقُ ﴿٣٠﴾
३०. आज तुझ्या पालनकर्त्याकडे जायचे आहे.
فَلَا صَدَّقَ وَلَا صَلَّىٰ ﴿٣١﴾
३१. तेव्हा त्याने ना तर समर्थन केले, ना नमाज अदा केली.
وَلَٰكِن كَذَّبَ وَتَوَلَّىٰ ﴿٣٢﴾
३२. उलट खोटे ठरविले आणि विमुख झाला
ثُمَّ ذَهَبَ إِلَىٰٓ أَهْلِهِۦ يَتَمَطَّىٰٓ ﴿٣٣﴾
३३. मग आपल्या कुटुंबियांकडे तोऱ्यात गेला
أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ ﴿٣٤﴾
३४. खेद आहे तुझ्याबद्दल! पश्चात्ताप आहे तुझ्यावर!
ثُمَّ أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰٓ ﴿٣٥﴾
३५. पुन्हा दुःख आहे आणि दुर्दशा आहे तुझ्यासाठी!
أَيَحْسَبُ ٱلْإِنسَٰنُ أَن يُتْرَكَ سُدًى ﴿٣٦﴾
३६. काय मनुष्य असे समजतो की त्याला व्यर्थ असे सोडून दिले जाईल
أَلَمْ يَكُ نُطْفَةًۭ مِّن مَّنِىٍّۢ يُمْنَىٰ ﴿٣٧﴾
३७. काय तो एक गाढ पाण्याचा थेंब नव्हता, जो टपकविला जातो?
ثُمَّ كَانَ عَلَقَةًۭ فَخَلَقَ فَسَوَّىٰ ﴿٣٨﴾
३८. मग तो रक्ताचा गोळा बनला, मग (अल्लाहने) त्याला निर्माण केले आणि योग्यरित्या बनविले.
فَجَعَلَ مِنْهُ ٱلزَّوْجَيْنِ ٱلذَّكَرَ وَٱلْأُنثَىٰٓ ﴿٣٩﴾
३९. मग त्यापासून जोडी अर्थात नर-मादा बनविले
أَلَيْسَ ذَٰلِكَ بِقَٰدِرٍ عَلَىٰٓ أَن يُحْۦِىَ ٱلْمَوْتَىٰ ﴿٤٠﴾
४०. काय (अल्लाह) या गोष्टी समर्थ नाही की मेलेल्यास जिवंत करावं?