Main pages

Surah Al-Fatihah ( The Opening )

Marathi

Surah Al-Fatihah ( The Opening ) - Aya count 7

بِسْمِ ٱللَّهِ ٱلرَّحْمَٰنِ ٱلرَّحِيمِ ﴿١﴾

१. अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे.

ٱلْحَمْدُ لِلَّهِ رَبِّ ٱلْعَٰلَمِينَ ﴿٢﴾

२. सर्व स्तुति - प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा पालनहार १ आहे.

ٱلرَّحْمَٰنِ ٱلرَّحِيمِ ﴿٣﴾

३. मोठा कृपावान, अतिशय दया करणारा आहे.

مَٰلِكِ يَوْمِ ٱلدِّينِ ﴿٤﴾

४. मोबदल्याच्या दिवसा (कयामत) चा स्वामी आहे.

إِيَّاكَ نَعْبُدُ وَإِيَّاكَ نَسْتَعِينُ ﴿٥﴾

५. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडेच मदतीची याचना करतो.

ٱهْدِنَا ٱلصِّرَٰطَ ٱلْمُسْتَقِيمَ ﴿٦﴾

६. आम्हाला सरळ (सत्य) मार्ग दाखव. १

صِرَٰطَ ٱلَّذِينَ أَنْعَمْتَ عَلَيْهِمْ غَيْرِ ٱلْمَغْضُوبِ عَلَيْهِمْ وَلَا ٱلضَّآلِّينَ ﴿٧﴾

७. अशा लोकांचा मार्ग, ज्यांच्यावर तू कृपा केली, त्या लोकांचा नव्हे, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला आणि ना मार्गभ्रष्ट झालेल्यांचा.